अमली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या पाच पोलिसांपैकी चौघांचे बेबीबरोबर प्रत्यक्ष व्यवहार उघड झाले असून त्यांनी कोटय़वधी रुपये कमविल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कुख्यात अमली पदार्थाची तस्कर बेबी पाटणकरशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी पाच पोलिसांना अटक केली होती.अटक केलेला हवालदार यशवंत पार्टे हा पत्नी मुक्तामार्फत अमली पदार्थाचे व्यवहार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिलासुद्धा या प्रकरणात अटक केली जाणार आहे. अटक केलेले पोलीस यशवंत पार्टे, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम माने या चौघांचा प्रत्यक्ष अमली पदार्थाच्या व्यवहारातील सहभाग उघड झालेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेबीच्या व्यवहाराने पोलीस कोटय़धीश
अमली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या पाच पोलिसांपैकी चौघांचे बेबीबरोबर प्रत्यक्ष व्यवहार उघड झाले असून त्यांनी कोटय़वधी रुपये कमविल्याची माहिती समोर आली आहे.
First published on: 02-06-2015 at 01:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby patankar drug racket make police officers millionaire