मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी आणि जुन्या वर्षाला अलविदा करण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने पंचतारांकित हॉटेल, उपहारगृह, क्लबसह पर्यटनस्थळी गर्दी होणार असून फटाक्यांची आतषबाजीही होणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉकटेल सेवनातील कल दर्शवणारा बकार्डी लिमिटेडच्या सहाव्या वार्षिक अहवालाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशेष बाब म्हणजे बकार्डी लिमिटेडने यंदा अहवालात भारतीय ग्राहकांचाही समावेश केला आहे. या अहवालानुसार विशेष समारंभादरम्यान आनंद द्विगुणित करण्यासाठी ४१ टक्के भारतीय ‘शॅम्पेन’ला पसंती देत आहेत, तर ‘व्होडका’ भेट म्हणून देण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. भेट म्हणून ‘स्कॉच व्हिस्की’ देण्याचे प्रमाण ४५ टक्के आणि ‘शॅम्पेन’ देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे.

अनेकदा आनंदाचा क्षण आपल्या प्रियजनांसोबत द्विगुणित करण्यासाठी आणि विजयाचा जल्लोष करण्यासाठी नागरिक पंचतारांकित हॉटेल आणि क्लबमध्ये जातात. त्या ठिकाणी जाऊन डीजेच्या तालावर मनसोक्तपणे थिरकतात आणि नवनवीन पदार्थांवर ताव मारून शीतपेयांसह कॉकटेलचेही सेवन करतात. तर काहीजण अधिक खर्च होऊ नये आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी घरीच पार्टी करणे पसंत करतात. बकार्डी लिमिटेडच्या अहवालानुसार एकूण भारतीयांपैकी ५४ टक्के नागरिक कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींसोबत कॉकटेलचे सेवन करत आहेत.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
140 samples of milk were collected by inspecting various establishments.
तपासणीसाठी दूध, दुग्धजन्य पदार्थांचे नमुने संकलित
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
how to stop alcohol cravings | 5 Ways to Manage Alcohol Cravings
Alcohol Cravings : दारू पिण्याची लालसा काही दिवसांत होईल कमी; फक्त डॉक्टरांचे ‘हे’ सोपे उपाय पाहा करून, जगाल निरोगी जीवन

सध्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरातील नागरिक उत्सुक असून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. दरम्यान, भारतातील ग्राहक नवीन हॉटेल, तसेच बारमध्ये जाऊन कॉकटेलचे सेवन करण्यास आणि तेथील वातावरण अनुभवण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, बकार्डी लिमिटेडच्या अहवालानुसार ४५ टक्के नागरिक नवीन बार आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉकटेलचे सेवन करणे पसंत करतात. तसेच ३२ टक्के नागरिक बिअरसोबत कॉकटेल घेणे पसंत करतात.

हेही वाचा : ‘बीएआरसी’कडून आठ नवीन पिकांचे वाण विकसित, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तांदूळ, तीळाच्या वाणांची निर्मिती

‘भारतातील नागरिकांकडून कॉकटेलला पसंती मिळत असून यामध्ये नावीन्य आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या नवनवीन बदल, ग्राहकांची ओळख व संशोधन करण्यासाठी बकार्डी लिमिटेडकडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. तसेच भारतातील बार व रेस्टॉरंट मालकांना मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत’, असे बकार्डी लिमिटेडचे भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे व्यवस्थापकीय संचालक विनय गोलिकेरी म्हणाले. तर भारतातील बकार्डी लिमिटेडचे ॲडव्होकेसी लीड असणारे जोनास ऍक्स म्हणाले की, ‘भारतातील ग्राहकांकडून कॉकटेल्ससाठी फ्रूटी (६६ टक्के), गोड (५३ टक्के) आणि मसालेदार (५० टक्के) या आगळ्यावेगळ्या फ्लेव्हर्सला पसंती मिळत असून पुढील १२ महिने हे फ्लेव्हर्स आघाडीवर राहतील’.

हेही वाचा : वित्तीय तूट वाढली

भारतात २०२५ मध्ये असणार हे ‘टॉप पाच मद्यमिश्रण’

१) व्होडका सोडा

२) व्हिस्की आणि कोक

३) व्होडका आणि लेमनेड

४) रम आणि कोक

५) मोहितो

Story img Loader