श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी सोमवारी दुपारी भिवंडी येथील उप-विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. वसई, शहापूर, भिवंडी यांसारख्या विविध भागांतील आदिवासी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चामुळे या परिसरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
केसरी रंगाच्या कार्डधारकांना नियमानुसार ३५ किलो धान्याचे वाटप केले जावे, स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळेची व्यवस्था करणे, वीटभट्टीवरील मजुरांची दरमहा आरोग्य तपासणी करणे, कुपोषण थांबवण्यासाठी वीटभट्टी मजुरांना शिधापत्रिका देऊन फिरते रेशनींग सुरु करणे, गरिबांना आम आदमी योजनेचा लाभ व्हावा यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी तसेच अंबाडी येथील ग्रामीण रुग्णालय बांधण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करणे यांसारख्या अनेक मागण्यासांठी सोमवारी ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासींनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली भिवंडी येथील उप-विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोलेकर, जया पारधी, संगिता भोमटे, भारती मांगात, अशोक सापटे आणि केशप पारधी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा