औद्योगिकीकरणात अव्वल असलेल्या आणि संपूर्ण देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील औद्योगिक विकासच गेल्या काही काळात खुंटला आहे. उद्योगांच्या स्थलांतराचा प्रश्न उभा ठाकला आणि मोठय़ा उद्योगांना महाराष्ट्रापेक्षा इतर राज्ये अधिक सोयीची वाटू लागली. यातून आता महाराष्ट्रापुढे औद्योगिक क्षेत्रातील आपला टक्का टिकवण्याचे आणि उद्योगांच्या विकासाची गती वाढवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. याच प्रश्नाची सखोल चर्चा ‘लोकसत्ता’ आणि सारस्वत बँक यांच्यातर्फे होणाऱ्या ‘बदलता महाराष्ट्र’च्या चौथ्या पर्वात ‘उद्योगाचे आव्हान’ या दोन दिवसीय चर्चासत्रात होणार आहे.
 सोमवार, २३ जून आणि मंगळवार, २४ जून रोजी मुंबईतील ‘ताज महाल’ हॉटेलमध्ये हे चर्चासत्र होईल.स्वातंत्र्यानंतर आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर काळाच्या ओघात सर्वच क्षेत्रांत वेगाने बदल झाले.
 महाराष्ट्रातील या बदलांचे प्रतिबिंब टिपण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीला एक दिशा देण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्यातर्फे ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू झाला. आतापर्यंतच्या तीन चर्चासत्रांमध्ये शिक्षण, नागरीकरण आणि शेतीमधील बदलांचा वेध घेऊन, समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या आणि भविष्यासाठी दिशादिग्दर्शनही झाले. आता सोमवार २३ जून आणि मंगळवार २४ जून रोजी उद्योग क्षेत्रावर चर्चासत्र होणार आहे.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह नामवंत उद्योजक, तज्ज्ञमंडळी यात सहभागी होतील. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘उद्योगधंद्यांसाठी महाराष्ट्रच का?’ या विषयावरील चर्चेने, तर समारोप ‘उद्योगांचे स्थलांतर किती खरे, किती खोटे?’ या चर्चेने होईल.
या शिवाय ‘चित्र राज्यातील औद्योगिक वसाहतींचे’, ‘लघु व मध्यम उद्योगांपुढील आव्हाने’, ‘उद्योग आणि वित्तपुरवठा’, तसेच ‘आम्ही उद्योजिका’ या विषयांवरही या दोन दिवसांत विचारमंथन होईल. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलता महाराष्ट्र
कधी   : २३ व २४ जून                          
कोठे :  ताज हॉटेल, मुंबई<br />प्रवेश निमंत्रितांसाठी    

बदलता महाराष्ट्र
कधी   : २३ व २४ जून                          
कोठे :  ताज हॉटेल, मुंबई<br />प्रवेश निमंत्रितांसाठी