बदलापूर येथील भाजपचे माजी नगरसेवक शरद म्हात्रे यांना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा गंधही नव्हता. दुचाकीचा टायर फुटून दगड पायाला लागला असावा, असा त्यांचा अंदाज होता. पण, घरी आल्यानंतर पायात शिरलेली गोळी पाहून त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला आणि आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.  या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी बदलापूर शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.
बदलापूर येथील भाजपचे माजी नगरसेवक शरद म्हात्रे हे सोमवारी रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. त्या वेळी अंबरनाथ-बदलापूरदरम्यान असलेल्या जांभूळ फाटय़ाजवळ कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही गोळी पायाला लागल्याने सुदैवाने ते यातून बचावले.
याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी बदलापूरमध्ये बंद पाळण्यात आला.

Story img Loader