मुंबई : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) दाव्याबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, ही गोळी शोधली का नाही ? पोलिसांवर गोळीबार करण्यापूर्वी तहान लागली म्हणून शिंदेला दिलेली पिण्याच्या पाण्याची बाटली जप्त का केली नाही ? पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या जखमेची न्यायवैद्यक चाचणी केली का ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून न्यायालयाने सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला व महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याबाबत पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणाविषयीही नाराजी व्यक्त केली.

शिंदे याला अन्य प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने घेऊन जात असताना त्याने पाणी मागितले. त्यामुळे, त्याच्या हातातील बेड्या काढून त्याला पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात आली. मात्र, या संधीचा फायदा घेऊन शिंदे याने वाहनातील एका पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल हिसकावून घेतले आणि गोळीबार केला, असा पोलिसांचा दावा आहे. असे असताना अशा गंभीर प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळाच केले गेले नसल्यावरून न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांना फटकारले. तसेच, केवळ याच प्रकरणात नाही, तर बहुतांश प्रकरणात पोलीस घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत नाहीत हे दुर्दैवी असल्याची टिप्पणी केली.

scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

हेही वाचा – महिला सक्षमीकरणाचा अनोखा उपक्रम!

खंडपीठाने सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करताना या चकमकीशी संबंधित सर्व पुरावे गोळा करणे, ते जतन करणे आणि न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून ते तपासणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. मृतदेह हा सर्वात मूक, परंतु बोलका साक्षीदार असतो. त्यामुळे, त्याच्याशी संबंधित न्यायवैद्यक पुरावे गोळा करून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे याचा पुनरूच्चार करताना शिंदे याच्या मृतदेहावरील न्यायवैद्यक पुरावे गोळा केले आहेत का ? अशी विचारणाही केली. त्याचवेळी, प्रत्येक पिस्तुलाची आणि त्याच्या काडतुसांची ठेवण वेगळी असते. त्यामुळे, शिंदे याच्या डोक्याला ज्या ठिकाणी गोळी लागली होती त्याचे व ज्या पिस्तुलाने त्याने पोलिसांवर गोळीबार केला त्याचे न्यायवैद्यक पुरावे गोळा करून त्याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण करण्याचे स्पष्ट केले.

या चकमकीत दोन वेगवेगळ्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे, त्याच्या पुंगळ्याही वेगवेगळ्या होत्या. प्रत्येक पिस्तुलाची फायरिंग पिन वेगळी असते आणि हा एक निर्णायक पुरावा असू शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, सगळ्या न्यायवैद्यक पुराव्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

गोळी सापडली नाही

धावत्या वाहनात चकमक झाली. त्यामुळे, शिंदे यांच्या डोक्याला लागलेली गोळी ही आरपार जाऊन नंतर गाडीच्या छताला छेदून बाहेर गेल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. त्यावर, ही गोळी सापडली का, ती किती दूर गेली, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर, गोळी सापडली नसल्याचे महाधिवक्त्यांनी सांगितल्यानंतर ही चकमक निर्जनस्थळी झाली आणि तो परिसरही फार लहान होता. मग गोळी का सापडली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर, गोळी शोधण्यात येईल, असे पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

हेही वाचा – मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा

जखमी पोलिसाच्या जखमेचा अहवाल सादर करा

शिंदे याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या जखमेचा वैद्यकीय अहवालही न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सीआयडीला दिले. या अधिकाऱ्याच्या जखमेची योग्य ती तपासणी करण्यात आली का, घटनास्थळी त्याच्या मांडीला लागून नंतर बाहेर पडलेली गोळी सापडली का, त्याच्या मांडीत गोळी गेल्याची आणि बाहेर पडल्याची जखम आहे का ? अशी प्रश्नांची सरबत्तीही न्यायालयाने केली. तसेच, त्याबाबतचा अहवाल आणि त्याला नेमकी कोणत्या पिस्तुलाची गोळी लागली हे आम्हाला पाहायचे असल्याचे न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.

मृत्यूची लवकरात लवकर चौकशी करा

शिंदे याच्या कोठडी मृत्यूची लवकरात लवकर चौकशी करा आणि त्याबाबतचा अहवाल १८ नोव्हेंबरपर्यंत सादर करा, असे आदेश न्यायालयाने महानगरदंडाधिकाऱ्यांना दिले. कायद्यानुसार, प्रकरणाची महानगरदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात असल्याची माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.