मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते आयपीएस प्रशिक्षण रिफ्रेशमेंट येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. सध्या ते मुंबईतील बंदर परिमंडळात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास पठारे यांच्या मार्गर्शनाखाली झाला होता. पठारे सध्या प्रशिक्षणासाठी तेलंगणामध्ये गेले होते. तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पठारे नातेवाईक भगवत खोडके यांच्यासह गेले होते. त्यांच्या मोटरगाडीला बसने दिलेल्या धडकेत डोक्याला दुखापत झाल्याने दोघांचा झाला. पठारे जानेवारीपासून मुंबईतील बंदर परिमंडळ येथे उपायुक्त पदावर कार्यरत होते.

सुधाकर पठारे हे २०११ तुकडीचे बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील होते. भारतीय पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वी ते सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. सुधाकर पठारे एम.एस्सी. ॲग्री, एलएलबी झाले आहेत. स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ मध्ये ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाली. १९९८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यात कार्यरत झाले. पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांना पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा या ठिकाणी नियुक्ती मिळाली होती. ठाणे पोलीस दलात परिंमंडळ-४ मध्ये पठारे कार्यरत असताना बदलापूर अत्याचाराप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक व याप्रकरणाचा तपास पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता.

तेलंगणामध्ये झालेल्या अपघातात उपायुक्त सुधाकर पथारे यांचे निधन झाले, ही घटना मुंबई पोलिसांसाठी अत्यंत दुःखद आहे. उपायुक्त पठारे हे एक कर्तव्यदक्ष, निष्ठावान आणि समर्पित अधिकारी होते. त्यांनी मुंबई बंदर परिमंडळासह आपल्या पूर्वीच्या जबाबदाऱ्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अचानक जाण्याने मुंबई पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली