जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेग याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी येत्या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी आणि न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठामध्ये हिमायत बेगला सुनावण्यात आलेली फाशीच्या शिक्षेची निश्चिती आणि शिक्षेविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर एकत्रितपणे सुनावणी होईल.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दोषी बेगला गुरुवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीवेळी बेगला न्यायालयात आणावे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृहातून त्याला सुनावणीमध्ये सहभागी करून घ्यावे, यावर न्यायालय सोमवारीच निर्णय देणार आहे.
१३ फेब्रुवारी २०१०मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण मृत्युमुखी पडले होते आणि ५८ जण जखमी झाले होते. पुण्यातील सत्र न्यायालयाने गेल्या एप्रिलमध्ये बेगला दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावली होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2013 रोजी प्रकाशित
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयात सोमवारपासून सुनावणी
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी हिमायत बेग याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी येत्या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-08-2013 at 06:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bakery casehc hearing on death penalty confirmation next week