शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सातत्याने ऑक्सिजन देण्यात येत असून ते सध्या काहीही खात नाहीत. पण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेले काही दिवस गंभीर आजारी असलेल्या शिवसेनाप्रमुखांना श्वास घेण्यासही त्रास होत असून तज्ज्ञ डॉक्टर सतत देखभाल करीत आहेत, अशी माहिती संबंधितांनी दिली. गेल्या काही दिवसांत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दसरा मेळाव्यासही ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा संदेश ध्वनिचित्रफीतीद्वारे दाखविण्यात आला होता.
शिवसेनाप्रमुख ऑक्सिजनवर, आहार बंद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सातत्याने ऑक्सिजन देण्यात येत असून ते सध्या काहीही खात नाहीत. पण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेले काही दिवस गंभीर आजारी असलेल्या शिवसेनाप्रमुखांना श्वास घेण्यासही त्रास होत असून तज्ज्ञ डॉक्टर सतत देखभाल करीत आहेत,

First published on: 14-11-2012 at 04:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackeray on ventilator