बाळासाहेबांवर जगातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करीत असून, सर्व शिवसैनिकांनी संयम ठेवावा असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आज (गुरूवार) शिवसेना खासदार आणि दै. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सांगितले. लिलावती रूग्णालयाचे डॉ. जलील परकार आणि त्यांची टीम मातोश्रीवर दाखल झाली आहे. डॉ. परकार गेल्या ४ वर्षांपासून बाळासाहेबांवर उपचार करत आहेत. आज सकाळी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनीसुध्दा बाळासाहेबांची भेट घेतली. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शिनसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशीसुध्दा बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2012 रोजी प्रकाशित
शिवसैनिकांनी संयम ठेवावा – उद्धव ठाकरे
बाळासाहेबांवर जगातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करीत असून, सर्व शिवसैनिकांनी संयम ठेवावा असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

First published on: 15-11-2012 at 10:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackerays condition stable maintain silence says uddhav thackeray