आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. आज वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होता. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंकडून काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
“प्रत्येक मतदार संघाची परिस्थिती नेमकी काय आहे? याचे अवलोकन करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व विभागप्रमुखांना काही सुचनाही केल्या. तसेच काही ठिकाणी विभाग प्रमुख बदलण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार त्यांनी संबंधित ठिकाणी बदल करण्याचे आदेश दिले राज ठाकरेंकडून देण्यात आले असल्याची माहिती”, मनसे नेते बाळानांदगावकर यांनी दिली.
दरम्यान, ज्यांना पदाधिकाऱ्यांना काम करायचं नाही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पद खाली करावे आणि इतरांना काम करण्याची संधी द्यावी, असे राज ठाकरेंकडून सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याबाबत विचारले असता, अद्यापही तारीख निश्चित झाली नसून ती निश्चित होताच माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले.