शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अतिनाजूक बनली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला व आईसमवेत शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दसरा मेळाव्यात चित्रफितीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी आपल्या प्रकृतीची कल्पना दिली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती दोलायामानच आहे. मध्यंतरी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव यांनी बाळासाहेबांची प्रकृतीची साऱ्यांनाच चिंता असल्याचे सांगून डॉक्टरांचे उपचार सुरु असल्याचे सांगितले. मात्र शिवसेनेच्या सूत्रांनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून वजनही घटले आहे.     

Story img Loader