शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव रविवारी सकाळी सात वाजल्यापासून दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील, असे शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केले. शिवसेना कार्यकर्त्यांनी शांतता व संयम बाळगावी, भावनेच्या भरात कोणतेही अविवेकी कृत्य करू नये, शांतता राखावी व हिंसक कारवाया घडतील असे काहीही करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
ठाकरे यांच्या देशभरातील सर्व चाहत्यांनी व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी आता ‘मातोश्री’ निवासस्थानी गर्दी करू नये. अंत्यदर्शनासाठी देशभरातून येणाऱ्यांची सर्व व्यवस्था शिवाजी पार्क येथे केली जाईल. शिवसेनाप्रमुखांनी निष्ठा व संयम यासाठी आपले जीवन वाहिले. आता कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Story img Loader