शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी उठणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका, त्यांची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा दिली. बाळासाहेबांची भेट घेतल्यानंतर, ‘मातोश्री’वरून घरी परतताना रात्री उशिरा राज यांनी वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली. ‘बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नाही. त्यांनी काही वेळापूर्वीच सूप घेतले,’ असे राज म्हणाले. दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी शनिवारी ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Story img Loader