गेले काही दिवस मृत्युशी झुंजणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मातोश्री या निवासस्थानी मालवली. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे लिलावती इस्पितळाचे डॉ. जलील परकार यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांचा शोक अनावर झाला. पोलिसांनी मातोश्रीभोवतीच्या बंदोवस्तात वाढ केली आहे.
दुपारी साडेतीन नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले, त्यानंतर भाजपनेते गोपीनथ मुंडे , विनोद तावडे आदि नेते मंडळी एका नंतर एक मातोश्रीवर दाखल होण्यास सुरूवात झाली,दुपारी ४: ५५ मिनीटांनी डॉ. जलील परकार यांनी बाळासाहेबांचे निधन झाल्याचे जाहीर केले. नंतर खासदार संजय राऊत यांनी देशवासीयांनी शांतता राखावी असे आव्हान केले आहे
* भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी – छत्रपती शिवाजी महाराज हे बाळासाहेबांचे दैवत होते. राजा शिवाजी महाराजांसारखा असावा आणि राज्य शिवशाहीसारखे असावे, असे ते म्हणत. बाळासाहेबांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. आमचा कुटुंबप्रमुखच गेला आहे. महाराष्ट्रात आणि देशात शिवशाहीचे राज्य यावे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.