मुंबई : मुंबई महापालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आज, सोमवारी इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात बांधलेल्या या सुसज्ज इमारतीचे उद्धाटन पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल. महाविद्यालय २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. आता या महाविद्यालयाला स्वतंत्र वास्तू मिळू शकणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची तीन वैद्यकीय महाविद्यालये शहर भागात आहेत. त्यामुळे पालिकेने २०१६ मध्ये पश्चिम उपनगरात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले होते. पश्चिम उपनगरात लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे या लोकांसाठी विशेष आणि अतिविशेष संदर्भ सेवा उपलब्ध करण्याकरिता पालिकेने नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. दीडशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठीची निविदा प्रक्रिया व बांधकाम पालिकेने २०१७ मध्ये सुरू केले होते. हे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण केले जाणार आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल.
विलेपार्ले मधील गुलमोहर मार्गावर जेव्हीपीडी स्कीम येथील डॉ. रु. न. कूपर रुग्णालयाच्या आवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. नवीन इमारत एमबीबीएस पदवी व पदव्युत्तर शिक्षणाकरिता उपयोगात येणार आहे. तळघर, तळमजला आणि त्यावर ५ मजले अशा स्वरूपाची या इमारतीची संरचना आहे. सुमारे ३६ हजार ३९७ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये तळमजला ते चौथ्या मजल्यापर्यंतचा वापर वैद्यकीय महाविद्यालयीन सेवांकरिता होणार आहे. पाचव्या मजल्यावर सर्व विभागप्रमुखांची कार्यालये असतील. यामध्ये तेरा विभागांची व्यवस्था राहणार आहे. मध्यवर्ती अंगण, २४० आसन क्षमतेच्या चार वर्गखोल्या, ३०० आसन क्षमतेचे एक परीक्षा सभागृह, ५०० आसन क्षमतेचे एक बहुउद्देशीय सभागृह, प्रात्यक्षिक कक्ष, अभ्यागत कक्ष, ८०० चौरस मीटरची दोन ग्रंथालये इत्यादी सुविधा या इमारतीत उपलब्ध आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी १८७ कोटी खर्च आला आहे.