शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला शिवाजी पार्क येथे सुरूवात झाली आहे. अथांग जनसागर आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित आहेत. बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महिला आणि तरूण मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत. सर्व शिवसैनिकांना बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी शिवाजी पार्कवर मोठाले स्क्रिन लावण्यात आले आहेत. काही वेळातच शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार होणार असून अंत्यविधीसाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.
अभिनेता अमिताभ बच्चन, शरद पवार, उद्योगपती अनिल अंबानी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, शाहनवाज हुसेन, वेणूगोपाल धूत, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, सरदार तारासिंग, मधुकरराव चौधरी, श्रेयस तळपदे, किरण शांताराम, सिद्धार्थ जाधव, विनय येडेकर, चंद्रकांत खैरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महापौर सुनील प्रभू, विनोद खन्ना शिवाज यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा