मुंबई : मुंबईतील हिरवळ वाढवण्यासाठी मियावाकी वनांचा प्रयोग झाल्यानंतर आता पालिकेने बांबूची लागवड करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असून येत्या आर्थिक वर्षात या प्रकल्पाला सुरूवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भांडूप ते कन्नमवारनगर परिसरात पहिल्या टप्प्यात ही लागवड केली जाणार आहे. मुंबईत सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आणि मोठ्या प्रमाणावर इमारतींचे बांधकाम होत असल्यामुळे हिरवळ कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील हिरवळ वाढवण्यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी मियावाकी वनांचा पर्याय आणला होता. मुंबईत अनेक ठिकाणी अशी मियावाकी वने तयार करण्यात आली आहेत. आता पालिकेने हिरवळ वाढवण्यासाठी बांबू रोपण करण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा – मुंबई : रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प, रस्त्यांच्या महानिविदेतील केवळ ११ रस्त्यांची कामे पूर्ण

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव असून अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वात प्रथम पूर्व द्रुतगती महामार्गालगत भांडूप ते कन्नमवारनगरपर्यंत ८१०० बांबू लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या रस्त्यालगत बांबूची एक भिंतच तयार होणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पीत भाषणात दिली. या प्रकल्पांतर्गत मुंबई सुमारे पाच लाख बांबू वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याकरीता जागेचा शोध उद्यान खात्यामार्फत केला जाणार आहे.

हेही वाचा – मुंबई : चार वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक

गेल्या काही वर्षांत पालिकेने विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली आहेत. त्यामुळे शहरातील झाडांची संख्या कमी होत असते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी पालिकेने मियावाकी जंगलाचा पर्याय पुढे आणला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने आतापर्यंत मियावाकी पद्धतीने चार लाखापेक्षा अधिक झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे मुंबई महानगराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योगिक जमिनींवर तसेच महानगरातील विविध उद्यानांमध्ये आणि रस्त्यांभोवती आहेत, असे उद्यान विभागाचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bamboo cultivation now in mumbai mnc urban greening project mumbai print news ssb