वांद्रे येथील अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठी या तरुणीचा आज शनिवारी मृत्यू झाला. तिच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तोंडात अॅसिड गेल्यामुळे तिच्या अन्न नलिकेला छिद्रे पडली होती. तसेच एक फुफ्फुस निकामी झाले होते. उपचारादरम्यान, तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. परंतु, आज सकाळपासून तिची प्रकृती आणखी खालावली व तिचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ जणींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचा समावेश होता.  ती २ मे रोजी वडील आणि नातेवाइकांसह गरीब रथ एक्‍स्प्रेसने मुंबईत आली होती, तेव्हा वांद्रे टर्मिनसवर एका तरुणाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात तिचे वडील, मावशी, काका आणि अन्य दोन प्रवासीही जखमी झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandra acid attack priti rathi died
Show comments