मुंबई : अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना तातडीने रक्त मिळावे यासाठी काही सरकारी रुग्णालयांमध्ये रक्तपेढी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेली रक्तपेढी रात्री ९ ते सकाळी ८ या वेळेत बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही रक्तपेढी २४ तास सुरू ठेवावी, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

वांद्रे येथील भाभा रुग्णालयामधील रक्तपेढी अनेक वर्षांपासून रात्री बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे रात्री अत्यावस्थेत आलेल्या किंवा गर्भवती महिला, नवजात बालक यांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी कूपर किंवा अन्य खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामध्ये बराच वेळ जाण्याची शक्यता असते. रुग्णांना तातडीने रक्त मिळावे यासाठी भाभा रुग्णालयाकडून जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयाच्या रक्तपेढीसोबत करार केला आहे. मात्र वांद्रे येथून जुहूला रात्री जाण्यासाठी अनेक वेळा कोणतेही वाहन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी अडचण होते. भाभा रुग्णालयातील रक्तपेढी रात्री बंद ठेवण्यामागे पुरेसे तंत्रज्ञ नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. रक्तपेढीमध्ये सध्या चार रिक्त पदे आहेत. त्यामुळे अन्य तंत्रज्ञांवर कामाचा भार पडत आहे. परिणामी, ही पदे तातडीने भरावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कूपर रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये २००८ मध्ये तंत्रज्ञांची भरती करण्यात आली होती. मात्र २०२२ मध्ये या रक्तपेढीचे खासगीकरण करण्यात आले. त्यामुळे येथील तंत्रज्ञांना भाभा रुग्णालयात बदली केल्यास तेथील कमतरतेवर तोडगा निघू शकतो. मात्र त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

Why Indian doctors prefer to go to the abroad
भारतातील डॉक्टर परदेशाची वाट का धरतात?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
world heart day kem hospital success in saving 189 patients life under stemi project
जागतिक हृदय दिन : केईएम रुग्णालयात स्टेमी प्रकल्पांतर्गत १८९ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश
Vascular ablation treatment in heart disease to be done in district hospitals
जिल्हा रुग्णालयांमध्ये होणार ह्रदयविकारातील रक्तवाहिन्यातील गाठ विरघळविणारा उपचार
Tata Hospital, Proton treatment system,
मुंबई : टाटा रुग्णालयातील प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान
Thane police, Thane traffic, Thane police injured,
ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचाच जीव धोक्यात, सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Police can conduct medical examination in three more hospitals
आणखी तीन रुग्णालयांमध्ये पोलिसांना वैद्यकीय तपासणी करता येणार
Fraud with doctor by give lure of installing solar power system in hospital
पुणे : रुग्णालयात सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक

हेही वाचा >>>मुंबई: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण, दोन महिलांसह पाच जणांना अटक

भाभा रुग्णालयाच्या आसपासच्या रक्तपेढींकडे आम्ही चौकशी केली. परंतु कोणीही करारासाठी तयार नव्हते. त्यामुळे आम्हाला जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयाच्या रक्तपेढीसोबत करार करावा लागला. आमची रक्तपेढी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते. त्यावेळेत रुग्णांना रक्त उपलब्ध केले जाते. त्यानंतर रुग्णांना क्रिटी केअरच्या किंवा महानगरपालिकेच्या अन्य रुग्णालयांतून रक्त आणून दिले जाते. यासाठी आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयाची रुग्णवाहिकाही उपलब्ध करतो. – डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक, भाभा रुग्णालय