मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पथकराचे नवीन दर आजपासून लागू झाले असून चारचाकी हलक्या वाहनांना आजपासून ऐकेरी प्रवासासाठी ८५ रुपयांऐवजी १०० रुपये, तर तर मिनी बस, टेम्पोच्या एकेरी प्रवासासाठी १३० रुपयांऐवजी १६० रुपये मोजावे लागतील. त्याचवेळी ट्रक, बससाठी आजपासून १७५ रुपयांऐवजी २१० रुपये असा पथकर असेल.
हेही वाचा : लग्नास नकार दिला म्हणून तरूणीवर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
एमएसआरडीसीच्या पथकर करारानुसार दर तीन वर्षांनी पथकरात वाढ होते. त्यानुसार एमएसआरडीसीने नवीन दर जाहीर केले असून ते आजपासून लागू झाले आहेत. त्याचवेळी परतीच्या प्रवासासाठी हलक्या वाहनांना आता ४२.५ रुपयांऐवजी ५० रुपये, मिनी बस, टेम्पोसाठी ६५ रुपयांवरून ८० रुपये तर, बससाठी ८७.५० रुपयांऐवजी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. मासिक पाससाठीही आजपासून नवे दर लागू झाले आहेत. त्यानुसार हलक्या चारचाकी वाहनांसाठी ५,००० रुपये, मिनी बस, टेम्पोसाठी ८,००० रुपये आणि ट्रक, बस साठी १०,५०० रुपये असे मासिक पासचे दर असणार आहेत.