मुंबई : दक्षिण मुंबईमधील गिरगाव, ग्रॅन्ट रोड आणि गावदेवी परिसरात वास्तव्याला असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या चारही महिला असून त्यापैकी एक महिला गेल्या १५ वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चारही महिलांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध परिमंडळ २ तर्फे विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डी. बी. मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. माजिदा गुलाम जिक्रिया शेख आणि नूरजहाँबेगम सुल्तान मुल्ला अशी या दोघींची नावे आहेत. यातील नूरजहाँ गेल्या सात वर्षांपूर्वी भारतात बेकायदेशिररित्या दाखल झाली होती. एका दलालाला पैसे देऊन ती बांगलादेशमधून नौकेतून कोलकाताला आली होती. त्यानतंर तेथून ती रेल्वेने मुंबईत दाखल झाली होते. गेल्या सात वर्षांपासून ती मुंबईत वास्तव्यास होती. माजिदा ही गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असून तिला एका बांगलादेशी मित्राने भारतात पाठविले होते. त्यासाठी तिने मित्राला काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. गेल्या काही वर्षांपासून ती गिरगाव परिसरात राहत होती. परिसरात छोटी-मोठी कामे करून ती उदरनिर्वाह चालवत होती.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा – मुंबई : पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज संध्याकाळी जाहीर होणार

हेही वाचा – मुंबई : लाकूड जाळून चालणाऱ्या बेकऱ्या बंद होणार ?

या विशेष मोहिमेअंतर्गत गावदेवी आणि व्ही. पी. रोड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्या दोघीही बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून भारतात पळून आल्या होत्या. काही महिने कोलकाता येथे राहिल्यानंतर त्या दोघीही नोकरीसाठी मुंबईत आल्या. तेव्हापासून त्या मुंबईत अनधिकृतपणे राहत होत्या. आरोपी महिलांनी भारतात वास्तव्य करण्यासाठी काही कागदत्रे तयार केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत. आरोपी महिलांविरोधात परकीय नागरिक कायदा, पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी करण्यात मदत करणाऱ्या दलालांची माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.