लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : काळाचौकी येथील राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयातील शौचालयाच्या भिंतीवरून उडी मारून पळालेल्या बांगलादेशी नागरिकाला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. भारतात बेकायदेशिररित्या राहत असल्याप्रकरणी आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विशाल उत्तम भारस्कर (४१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. एटीएसने फसवणुकीसह अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वर ऊर्फ शहादत उर्फ शाजू अबुल हाषिम शेख (२९) याला ८ डिसेंबर २०२२ रोजी अटक केली होती. ६ मार्च रोजी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान आरोपीने गुन्हाही कबूल केला होता. त्याला २९ सप्टेंबर रोजी १० महिन्यांची शिक्षा आणि ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला होता. निकालामध्ये आरोपीचे प्रत्यार्पण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, प्रादेशिक परकीय नागरिक नोंदणी अधिकारी, तसेच पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा-२, गु. अ. वि. मुंबई, कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्यात आला होता.

आणखी वाचा-मुंबईकरांना अनुभवता येणार गुलाबी थंडी; रात्री गारवा, दिवसा मात्र उष्णता

आरोपीने शिक्षा पूर्ण भोगल्यानंतर त्याला १ नोव्हेंबर रोजी एटीएसच्या काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. तेथे तो पोलिसांच्या देखरेखीखाली खाली होता. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४५ च्या सुमारास अंघोळीचे निमित्त करून तो प्रसाधनगृहात गेला. कपडे धुण्याचे निमित्त करून तो पुन्हा आतमध्ये गेला. आरोपी कपडे धूत असल्याने तक्रारदार दैनंदिन माहिती घेण्यासाठी मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई व अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई येथील नियंत्रण कक्षातील रायटर यांना दूरध्वनी करण्यासाठी बाहेर गेले. त्यानंतर ७.३० ते ७.४५ च्या सुमारास आरोपी दिसत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी प्रसाधनगृहात शोध घेतला. त्यावेळी आरोपी भिंतीवर चढून उडी मारून पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आरोपी पळून गेल्याने खळबळ उडाली. पोलीस पथकाने काळाचौकीसह कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक, शिवडी रेल्वे स्थानक, सीएसएमटी रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस व टिळक नगर रेल्वे स्थानक, वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. अखेर आरोपी विक्रोळी परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपी शेखला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले.