लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : टास्क फसवणुकीद्वारे माझगाव येथील गृहिणीच्या खात्यातून सव्वाआठ लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून बँक खात्यातील व्यवहारांच्या माहितीद्वारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
Fraud of nine lakhs on pretext of investing in stock market
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक
young man cheated 600 people of Rs 22 lakh 41 thousand 760 on pretext of getting flat in Mhada
‘म्हाडा’चे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने ६०० जणांची फसवणूक
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा
fraud with Depositors by Rajasthan Multistate
‘राजस्थान मल्टिस्टेट’मध्ये ठेवीदारांची फसवणूक
Shraddha Kapoor and Shakti Kapoor buy luxury apartment
श्रद्धा कपूर व शक्ती कपूर यांनी मुंबईत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

माझगावमधील बॅ. नाथ पै मार्ग परिसरात तक्रारदार महिला कुटुंबासोबत राहते. त्यांच्या पतीची नोकरी सुटल्यामुळे त्या नोकरीच्या शोधात होत्या. ६ जानेवारीच्या दुपारी त्यांना इन्स्टाग्रामवर एक अर्धकालीन नोकरीची जाहिरात दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर जेफरी स्मिथ नावाचा व्हॉट्स अॅप चॅट सुरू झाला. समोरील व्यक्तीने तक्रारदारांकडे बायोडेटाची मागणी केली. त्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांच्याकडे बँक खात्याची माहिती भरून घेण्यात आली. त्यानंतर टेलिग्राम या समाज माध्यमांद्वारे आकांक्षा नावाची महिला त्यांच्या संपर्कात आली.

आणखी वाचा-विमानात बॉम्ब ठेवल्याचा खोटी माहिती देणाऱ्या प्रवाश्यावर गुन्हा

टेलिग्राम खात्यावर आलेल्या काही चित्रफीतींना लाईक करून त्याचे स्क्रिनशॉट काढून पाठविण्यास तक्रारदार महिलेला सांगण्यात आले. त्यांनी तसे करताच त्यांच्या खात्यात एकूण २७७ रुपये जमा झाले. त्यामुळे तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन करण्यात आरोपींना यश आले. त्यानंतर त्यांना अधिक पैसे कमवण्यासाठी आनंद इन्स्टा आणि फॉर्मल एम्प्लॉई नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर सहभागी करण्यात आले. त्यावेळी त्यांना पैसे जमा करून विविध टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. ६ ते २३ जानेवारी या काळात तक्रारदार महिलेला वेगवेगळा टास्क देऊन त्यांच्याकडून एकूण आठ लाख १७ हजार रुपये उकळण्यात आले. त्यांच्या आभासी खात्यामध्ये नफा दिसत होता.मात्र ती रक्कम काढता येत नव्हती. त्याबाबत विचारणा केली असता अधिक रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रारदार महिलेची खात्री पटली. अखेर त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या कानावर घालत आणि भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. महिलेच्या बँक खात्याची माहिती बँकेकडे मागवण्यात आली असून त्याद्वारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader