केशकर्तनालये, सलून, स्पा अद्यापही बंद; ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची तयारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यावर शहरातील इतर व्यवसायांना मान्यता मिळाली असली तरी केशकर्तनालये, सलून आणि स्पा बंद असल्याने यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य कमालीचे अंधारात आहे. यापैकी काहीजण ग्राहकांच्या घरी जाऊन, सौंदर्यसेवा पुरवून व्यवसायाला पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, सेवा देताना करोना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेची खूपच काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे सेवांचे दर वाढवावे लागत असल्याने घरपोच सेवेलाही कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंका या व्यावसायिकांना आहे.

घरपोच सेवांमध्ये हेअरकट, कलरिंग, आयर्निग, स्ट्रेटनिंग करणे, व्ॉक्सिंग, आय ब्रो, फेशियल, ब्लिचिंग, क्लीन अप, मसाज आदी सगळेच देता येते. परंतु, करोनाच्या धास्तीपायी सध्यातरी या सेवेला फारसा प्रतिसाद नाही. दुसरीकडे या सेवाही महाग झाल्या आहेत. ‘ग्राहकांकडे जाताना मुखपट्टया, हातमोजे, पीपीई कीट, सॅनिटायझर वापरावे लागते. यासाठी जास्त खर्च होत असल्याने सौंदर्यसेवांच्या दरात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे सौंदर्यसेवांचे सध्याचे दर दुप्पट झाले आहेत,’ असे ईमेज ब्युटी पार्लरच्या भक्ती शिंदे यांनी सांगितले. दुसरीकडे जी मंडळी या सेवा आधीपासून घरपोच देत होते, त्यांचाही व्यवसाय कमी झाला आहे. ‘मी अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या घरी जाऊन सौंदर्यसुविधा देत आहे. त्यांच्या घरी गेल्यावर आम्ही र्निजतुकीकरण आणि सुरक्षेची योग्य काळजी घेतो. त्यात बराच वेळ जातो. इतर वेळेस दिवसाला मी ६ ग्राहकांच्या घरी जायचे. आता मात्र आठवडय़ातून एक ग्राहकाकडून बोलावणे येते. महिन्याला ३० ते ४० हजारावरील व्यवसाय आता १ ते २ हजार रुपयांवर आला आहे,’ असे ब्युटीशियन असलेल्या अर्चना जाधव यांनी सांगितले.

‘टाळेबंदीमुळे अनेक ग्राहकांचे रोजगार गेले आहेत किं वा त्यात कपात तरी झाली आहे. पैसे वाढवल्यास त्यांनाही परवडणार नाही. त्यामुळे एकदा परिस्थिती पूर्ववत झाल्यास या दरात वाढ केली जाईल. टाळेबंदीमुळे आमच्या व्यवसायावर गदा आली आहे. टाळेबंदीत सौंदर्यप्रसाधने आणि साहित्य मिळत नाही. काही उत्पादने घरच्या घरी बनवून वापरत आहे,’ असे भाग्यश्री सोनावणे यांनी सांगितले. श्रद्धा शिंदे हिचे एल्फिन्स्टन येथे ब्युटीपार्लर असून, ती महिलांना मेकअपचे ऑनलाइन प्रशिक्षण देते. अनेक ग्राहकांनी घरी येण्यासाठी विचारणा ली. मात्र मीच ते टाळते आहे, असे तिने सांगितले.

सौंदर्यप्रसाधन आणि साहित्यांची कमतरता

क्रॉफर्ड मार्केट, भायखळा, खार, सांताक्रूझ आणि दादर येथे सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणारी दुकाने मोठय़ा संख्येने आहेत. परंतु, टाळेबंदीमुळे मालच उपलब्ध नसल्याने काम सुरू करण्यात अडचणी आहेत.

घरी सौंर्दयसेवा देताना घ्यायची काळजी

’ ग्राहकांच्या आजार आणि तापमानाची नोंद

’ ग्राहकांना पीपीई कीट देणे

’ त्वचेच्या संबंधित फेशियल, ब्लीच, क्लीन अप, पेडिक्युयर, मॅनिक्युयर, मसाज हे करताना हातमोजे वापरणे