गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मेट्रो किंवा इतर प्रकल्पाच्या कामांसाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिगेट्समुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स तात्पुरते हटवले आहेत. विसर्जनानंतर पुन्हा बॅरिगेट्स लावून रस्ते बंद केले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात, म्हणाले, “मागील काळात…”

मुंबईत सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पाचे, त्यातही मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी मुंबईतील अनेक रस्ते बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पादचाऱ्यांचीही मोठी गैरसोय होते. अशात दहा दिवसांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनावेळी, मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत बॅरिगेट्सचा मोठा अडथळा होतो. त्यामुळे बॅरिगेट्स हटविण्याची मागणी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून एमएमआरडीएकडे करण्यात येते. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. मोठ्या मंडळांच्या विनंतीनुसार मुंबईतील काही महत्त्वाच्या रस्त्यावरील बॅरिगेट्स तात्पुरती हटविण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही. श्रीनिवास यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरीलकाही रस्त्यांचा यात समावेश आहे. सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता येथील काही ठिकाणांचाही यात समावेश आहे. विसर्जनानंतर बॅरिगेट्स पुनः लावण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barriers of barraget removed in mumbai ganesh immersion mumbai print news amy