नागरिकीकरणाचा झपाटा वाढला असला तरी बदलापूरच्या शहराजवळील काही भाग अजूनही आपला ग्रामीण वसा जपून आहे. बदलापूर शहराच्या पश्चिमेकडे उल्हास नदी ओलांडून पुढे जात असताना जसजसे शहरीकरण लुप्त होत जाते, तसतसा हिरवा नजारा दृष्टीस पडतो. हाच रस्ता बारवी धरणाकडे जातो. मात्र रस्त्याने जाता आजूबाजूला हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्यातून प्रसवणारे दुग्धझरे नजरेस पडतात आणि मन उल्हासित होते.

uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
village in Jalgaon district where Yatra of bride and groom celebrated for many years
देव-देवतांची नाही तर ‘या’ गावात भरते चक्क नवरदेव-नवरीची यात्रा
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
rabbit and dog viral video
‘शेवटी त्याच्या जीवाचा प्रश्न होता…’ कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी ससा वाऱ्याच्या वेगाने धावला; पण पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… पाहा थरारक VIDEO
traffic stopped due to snake crossing road on khambatki ghat
सातारा : सरपटणाऱ्या जीवासाठी खंबाटकी घाट थांबला
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात

या रस्त्यावर जागोजागी पिकनिक स्पॉट आहेत. ठीकठिकाणी असणाऱ्या धबधब्यांवर तरुणाईची गर्दी झालेली पाहायला मिळते. रस्ता पुढे जात राहतो आणि हळूहळू बारवी परिसरातील जंगलात प्रवेश करतो. नैसर्गिक विविधतेने संपन्न असलेला हा परिसर आपल्याला मोहीत करतो. हिरवेगार डोंगर, विविध प्रकारची वृक्षसंपदा, फुलझाडे, किलबिलणारे पक्षी, डोंगरातून वाहणारे झरे.. विपुल धनसंपन्नतेचे दर्शन येथे होते. सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात सर्वत्र फिरता येत नाही. मात्र पर्यटकांसाठी येथे खास सोयी करण्यात आल्या आहेत. या परिसरात अनेक रिसॉर्ट व हॉटेल आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या निवास व भोजनाची सोय होते.

हा सारा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे. बारवी धरणामुळे तयारी झालेला जलाशय आणि या जलाशयाभोवतीचा परिसर अतिशन सुंदर आणि निसर्गसंपन्न आहे. जलाशयाच्या काठावर अनेक जण वनभोजन करतात. अनेक पक्ष्यांचे दर्शन येथे होते. पावसाळय़ात आणि हिवाळय़ात अनेक पक्षीनिरीक्षक येथे भेटी देतात. पाण्यातील सापही येथे किनाऱ्यावर बसून पाहायला मिळतात. या जंगलात वन्य प्राण्यांचा वावर आहे. काही ठिकाणी माकडांचे दर्शन होते. त्यांच्या मर्कटलीला पाहण्याचा आनंद अनेक पर्यटक घेतात. जलाशयाच्या काठी काही पाणपक्षी वावरताना दिसतात. मुंबई, पुण्यातील काही धनाढय़ांनी येथे बंगले उभारले आहेत, अशाच एका बंगल्यावर मोराचे दर्शन झाले.

दूरून रस्त्यावरून बारवी धरणाची भिंत आणि त्यावरील ‘एमआयडीसी बारवी डॅम’ हे मोठय़ा अक्षरातील शब्द दिसतात. मात्र त्या बाजूस धरण असल्याने तिथे जाण्यास मनाई असल्याचे येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले. परिसरातील काही भागात शेती असून, स्थानिक आदिवासी शेती करताना आढळतात. विविध प्रकारच्या रानभाज्यांचे दर्शन या शेतीत होते.

बारवीच्या जलाशयात एक बंधारा घातला असून त्यामुळे तिथे धबधबा तयार झाला आहे. अनेक पर्यटक या बंधाऱ्यात वर्षांसहलीचा आनंद घेतात. पायऱ्या पायऱ्यांनी जाणारे हे पाणी अतिशय आकर्षक दिसते. पुढे झुळझुळ वाहणाऱ्या जलाशयातही अनेक पर्यटक चिंब होऊन जातात.

बारवी परिसरात जंगल सफारी आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद पर्यटकांना लुटता यावा यासाठी राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत. एकूणच हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असल्याने त्याशिवाय घनदाट वनराई, शानदार जलाशय आणि जंगली प्राण्यांचा वावर यामुळे परिसर बहारदार वाटतो. त्यामुळे जर येथे निसर्गपर्यटन केंद्र झाले, तर पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल, हे निश्चित.

कसे जाल?

  • बारवी धरण परिसर
  • बदलापूर स्थानकाबाहेरून बारवीला जाण्यासाठी एसटी बससेवा उपलब्ध आहे.
  • सहा आसनी गाडय़ांनीही या ठिकाणी जाता येते.

Story img Loader