मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीद्वारे हा निकाल पाहता येईल.

बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी कक्षातर्फे २९ मे २०२४ रोजी विविध ११५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी कक्षातर्फे अतिरिक्त सीईटी घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आताच्या सीईटीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत, असे विद्यार्थी अतिरिक्त सीईटी देऊ शकतात. या अतिरिक्त सीईटीचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bca bba bbm bms cet result declared mumbai print news amy
First published on: 28-06-2024 at 15:54 IST