मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ना. म. जोशी मार्ग चाळीतील १५४ पात्र पोलिसांना पुनर्वसन इमारतीतील हक्काच्या घराची हमी म्हाडाकडून देण्यात आली आहे. मंगळवारी म्हाडा भवनात या पोलिसांच्या घरांसाठी सोडत काढण्यात आली असून पुनर्विकासात नवीन इमारतींमधील त्यांची घरे निश्चित करण्यात आली आहेत.

बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत पोलीस निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या २२०० हून अधिक पात्र आजी-माजी पोलिसांना हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी १५ लाख रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने पहिल्या टप्प्यातील पोलिसांची घरे रिकामी करून घेत इमारतींच्या पाडकामाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्ग येथील १५४ पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीतील घराची सोडतीद्वारे हमी देण्यात आली.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ

हेही वाचा : शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांचा कार्यगट ; मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांचा समावेश

इमारत क्रमांक १, २, ५, १२ आणि १३ पोलीस विभागाच्या अखत्यारीत आहेत. या पाच इमारतींमध्ये एकूण १८२ निवासी गाळे/सदनिका आहेत. या निवासी गाळे/ सदनिकांमध्ये राहणाऱ्या १८२ पैकी १५४ पात्र गाळेधारकांची यादी पोलीस उपायुक्तांनी मुंबई मंडळाकडे दिली आहे. या यादीनुसार पात्र सदनिकाधारक पोलिसांसाठी घराची निश्चिती करण्यात आली. आता या पोलिसांशी करारनामा कण्यात येणार असून ते वास्तव्यास असलेल्या इमारती पाडून त्याजागी बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.