मुंबईच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची तयारी सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या विसर्जनात विघ्न येऊ नये यासाठी किनाऱ्यांवर विविध पातळ्यांवर उपाय योजले आहे. या दिवशी समुद्राला मोठी भरती असल्याने सर्वानी सावधानता बाळगण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

विसर्जनाची व्यवस्था पाहण्यासाठी पालिकेचे दीड हजार कर्मचारी उद्या चौपाटी तसेच इतर विसर्जनस्थळांवर तैनात राहतील. गिरगाव चौपाटीवर यावर्षी १३ हजारांहून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन होण्याचा अंदाज असून, किनाऱ्यावरील वाळूमध्ये वाहन अडकून पडू नये यासाठी दोनशेहून अधिक लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी स्टिंग रे चावल्याने उडालेल्या गोंधळानंतर आता लहान हातगाडय़ा, सहा जर्मन तराफे व सहा होडय़ांची व्यवस्थाही आहे. सात निर्माल्य कलश लावले गेले असून निर्माल्य तातडीने वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २८३ फ्लड लॅटर्न व चार सर्च लाइटची व्यवस्था तसेच फिरत्या शौचालयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विसर्जनाच्या संपूर्ण तयारीची पाहणी केली.
विर्सजन सोहळ्यात छुप्या कॅमेऱ्यांची नजर
शहर व उपनगरात गणपती विर्सजनाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड काढणाऱ्या टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी छुप्या कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि हवालदार असे एकूण ३८ हजार ४०७ पोलीस महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या १० कंपन्या आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी असणार आहेत.
शहर, उपनगरांत कडेकोट पोलीस बंदोबस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती-ओहोटीच्या वेळा
रविवारी सकाळी साडेअकरा आणि रात्री पावणेबारा तसेच सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भरती आहे. यावेळी पाण्याची पातळी साडेचार मीटरपेक्षा जास्त वाढणार आहे. रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता व सोमवारी पहाटे पावणेसहा वाजता ओहोटी आहे. भरती व ओहोटी या दोन्ही वेळा काळजी घेणे आवश्यक असून, खोल समुद्रात जाण्याऐवजी किनाऱ्यावर विसर्जनासाठी केलेल्या सोयींचा वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
’ विसर्जनासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज
’ पालिकेचे दीड हजार कर्मचारी विसर्जनस्थळावर
’ १३ हजारांहून अधिक गणेशमूर्तीच्या विसर्जनाचा अंदाज
’ रुग्णवाहिका व अग्नीशमन दलाची वाहनेही तैनात