केंद्र सरकारने लागू केलेल्या एफडीआयबाबत राज्य सरकार पहिल्यापासून सकारात्मक असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका शेतकऱ्यांचे हित पाहण्याची आहे. आपण पुन्हा उपमुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्ते, आमदार आणि पूर्वाश्रमीच्या सहकारी मंत्र्यांची इच्छा असल्याचे सांगून पवार यांनी ते मंत्रिमंडळात परतणार असल्याचे संकेत गुरुवारी दिले. वाशी येथील एका खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या आडून आपली इच्छा व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉर्डन महाविद्यालयत गुरुवारी अजितदादा यांना इस्माईल साहेब मुल्ला आदर्श रयत सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार मंदा म्हात्रे, संस्थेचे अनिल पाटील, जयश्री चौगुले आणि अरविंद बुरुंगळे उपस्थित होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा