मुंबई : जी. टी. रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अतिदक्षता विभागात आणखी १० खाटांची भर पडणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई विभागामधील अत्यव्यस्थ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्तशुद्धकरण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.

जी.टी. रुग्णालयाच्या आवारात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून या रुग्णालयामध्ये अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विविध विभागाचे प्राध्यापक व डॉक्टरही उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी जी. टी. रुग्णालयामध्ये फक्त १० खाटांचा समावेश असलेला अतिदक्षता विभाग होता. करोनाकाळात या विभागात अतिरिक्त १० खाटा वाढविण्यात आल्या. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या जी. टी. रुग्णालय व कामा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागासाठी प्रत्येकी पाच खाटा उपलब्ध करण्यात येत आहेत. यामुळे जी. टी. रुग्णालयामधील शस्त्रक्रिया विभाग आणि अत्यावश्यक विभागाच्या अतिदक्षता विभागातील खाटांच्या संख्येत वाढ होणार आहे. जी. टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या २५ होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील फोर्ट, कुलाबा, क्रॉफर्ड मार्केट, गिरगाव, मरिन लाईन्स या परिसरातील सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. अतिदक्षता विभागात खाट उपलब्ध नसल्यास या विभागातील रुग्णांना जे.जे. रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जी. टी. रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढविण्यात येणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

हेही वाचा >>>शिवसेना , काँग्रेसमध्ये मलबार हिल मतदारसंघावरून रस्सीखेच

जी. टी. रुग्णालाप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाशी संलग्नित केलेल्या कामा रुग्णालयामध्येही लवकरच पाच खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कामा रुग्णालयातील महिला रुग्णांना अतिदक्षता विभागासाठी आता जे.जे. किंवा अन्य रुग्णालयात पाठवावे लागणार नाही. प्रकृती गंभीर असलेल्या महिला रुग्णांवर कामा रुग्णालयातच उपचार करणे शक्य होणार आहे.

रक्तशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र व्यवस्था

जी. टी. रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाप्रमाणेच रक्तशुद्धीकरण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. या रक्तशुद्धीकरण केंद्रासाठी जी.टी. रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचा विचार सुरू आहे. रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचारादरम्यान उत्तम सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये माफक दरात रक्तशुद्धीकरण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळेल, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.