विधान परिषदेत बुधवारी बीड जिल्हा सहकारी बँकेतील कथित कर्ज गैरव्यवहारावरून विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. परिणामी उपसभापती वसंत डावखरे यांना दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. विधान परिषदेत तावडे यांनी मंगळवारी बीड बँकेतील कर्जप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचा औचित्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपमधूनच राष्ट्रवादीत गेलेले धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याच दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संजयकाका पाटील यांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्याची घोषणा ऐकण्यासाठी गोपीनाथ मुंडे गॅलरीत हजर होते.
बीड बँकेतील घोटाळ्यावरून भाजप-राष्ट्रवादीत खडाजंगी
विधान परिषदेत बुधवारी बीड जिल्हा सहकारी बँकेतील कथित कर्ज गैरव्यवहारावरून विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी
First published on: 27-02-2014 at 05:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed bank scam clash in bjp ncp