हल्ली घराघरांत नातवंडांपासून अगदी आजोबांपर्यंत आणि बसच्या रांगेपासून ते अगदी लोकलच्या प्रवासापर्यंत भ्रमणध्वनीत डोके खुपसून गेम खेळणारी हजारो मंडळी रोज सहज पाहायला मिळतात. अशाच गेमवेडय़ांनी ‘गुगल प्ले स्टोअर’वर नव्या वर्षांतले गेम आपल्या भ्रमणध्वनीत डाउनलोड करून घेण्याचा धडाका लावला आहे. यात सर्वाधिक ‘डिअर हंटर-२०१६’ हा गेम तब्बल एक कोटी गेमवेडय़ांनी डाउनलोड केल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत गेिमगचे लोण जगभरात वाढत आहे. साध्या लोकल गाडीतून प्रवास करताना सहज आजूबाजूला नजर फिरवली तरी लक्षात येते की वीसपकी किमान आठ जण तरी भ्रमणध्वनीवर गेम खेळत असतात.

इतकेच नव्हे तर जगभरातील मोठय़ा व्यावसायिकांच्या यादीतही आता गेमर्स म्हणजेच गेम्स खेळून पसे मिळणाऱ्यांच्या नावाचा समावेश होऊ लागला आहे. पूर्वी केवळ वेळ घालवण्यासाठी खेळला जाणारा गेम आता व्यापक झाला आहे. त्याची बाजारपेठही प्रचंड विस्तारली असल्याचे ऑनलाइन विषयाचे अभ्यासक रामचंद्र नाईक यांनी सांगितले.

मात्र गेम्स डाउनलोड करताना कंपनीच्या अटी आणि शर्तीना सहज होकार भरला जातो. त्यात आपण आपल्या अनेक  बाबींची माहिती कंपनीच्या हाती देत असतो. प्रत्येक लेव्हल पार करताना आपण कुठे अडकतो. त्या माहितीच्या आधारे कंपनी गेमची निर्मिती करत असते. त्यामुळे गेम डाउनलोड करण्यापूर्वी अटी नीट वाचाव्यात, असे आवाहन नाईक यांनी केले.

सध्या नव्या वर्षांपूर्वीच अनेक कंपन्या संपूर्ण कुटुंबालाच लक्ष्य करून गेम्सची निर्मिती करतात. यंदाही नव्या वर्षांतले मोफत आणि विकत असे दोन्ही प्रकार प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे गेम चाहत्यांना नव्या वर्षांपूर्वीच हे गेम डाउनलोड करता येत आहेत. यात एक लाखापासून ते एक कोटीपर्यंत गेम्स डाउनलोड केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

गेम्सची नावे आणि डाउनलोड

डिअर हंटर- २०१६ एक कोटी

कूकिंग डॅश- २०१६ पन्नास लाख

सोकर- २०१६ दहा लाख

फ्युरिअस कार ड्रायव्हर- २०१६ एक लाख

Story img Loader