मुंबई : महाविकास आघाडी (मविआ)म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढल्यास यश मिळते हे कसबाच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गेल्या साडे तीन वर्षांत विधानसभा पोटनिवडणुका तसेच विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास विजय प्राप्त करता येतो हे अनुभवास आले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविल्यास भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

चिंचवडमध्ये शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीचा राष्ट्रवादीला फटका बसला. कसबा पेठेप्रमाणेच चिंचवडमध्ये सरळ लढत झाली असती तर निकाल बदलू शकता असता, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. कसबा पेठेप्रमाणेच देलगूर, कोल्हापूर उत्तर, अंधेरी पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष एकत्र सामोरे गेल्याचा फायदा झाला होता. फक्त पंढरपूरची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली होती. विधान परिषदेच्या नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता. यापूर्वी पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधरमध्येही महाविकास आघाडी एकत्र लढल्याचा फायदा झाला होता.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ambadas Danve
Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावरून ‘मविआ’त रस्सीखेच? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य तो निर्णय…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सरळ लढती झाल्यास भाजपपुढे मोठे आव्हान असेल. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेच्या ४८ पैकी किमान ४० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो.

भाजपचे विधानसभेतील संख्याबळ घटले

मुंबई : दोन्ही जागा कायम राखता आल्या नसल्याने विधानसभेतील भाजपचे संख्याबळ एकाने घटले आहे. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. यापैकी कसब्याची जागा भाजपने गमाविली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले होते. पंढरपूरची पोटनिवडणूक जिंकल्याने भाजपचे संख्याबळ १०६ झाले होते. कसब्यातील पराभवामुळे भाजपचे संख्याबळ पुन्हा १०५ झाले आहे. विद्यमान विधानसभेतील सहा आमदारांचे आतापर्यंत निधन झाले. यापैकी चार मतदारसंघ निधन झालेल्या लोकप्रतिनिधीच्या राजकीय पक्षाने कायम राखले आहेत. पंढरपूर (राष्ट्रवादी) आणि कसबा पेठ (भाजप) हे दोन मतदारसंघ आधी निवडून आलेल्या राजकीय पक्षांना कायम राखता आले नाहीत. देगलूर, कोल्हापूर उत्तर, अंधेरी, चिंचवड या मतदारसंघांत मृत आमदारांचे कुटुंबीय पोटनिवडणुकांमध्ये निवडून आले आहेत.

Story img Loader