मोबाइलवर मोठय़ा आवाजात गाणी चालू असतील, कोणी मोठय़ाने बोलत असेल किंवा मोबाइलवर बोलताना चालत्या गाडीत चढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर बेस्टचे वाहक त्या प्रवाशाला सरळ खाली उतरण्याचे आदेश देऊ शकणार आहेत. तसे अधिकारच बेस्ट प्रशासनाने वाहकांना दिले आहेत. त्यामुळे बेस्टच्या नियमित प्रवाशांना बसमध्ये बसताना मोबाइल प्रेमाला मुरड घालावी लागणार आहे.
काही प्रवासी मोबाइल, ट्रान्झिस्टर अथवा एमपी थ्रीवर गाणी ऐकत बेस्टच्या बसगाडय़ांमधून प्रवास करतात. काहीजण मोबाइलवर बोलता बोलता बस पकडतात किंवा उतरतात. बसमध्येसुद्धा सहप्रवाशांची तमा न बाळगता मोबाइलवर मोठमोठय़ाने बोलत असतात. अशा महाभागांमुळे तिकीट देणाऱ्या बसवाहकाचा खोळंबा होतो. असे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहेत. इतर प्रवाशांना नाहक होणारा त्रास आणि बसवाहकाचा खोळंबा टाळण्यासाठी प्रवासादरम्यान या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. न जुमानणाऱ्या प्रवाशाला महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९-१०२ (१) (५) अन्वये बसमधून खाली उतरविण्याचे अधिकार बस वाहकांना देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा