स्वातंत्र्यलढय़ातील तसेच गोवा मुक्तीतील स्वातंत्र्यसैनिकांना १५ ऑगस्टपासून  बेस्ट उपक्रमाने बसगाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. मात्र प्रवास करताना सोबत आणलेल्या सामानाचे त्यांना नियमानुसार शुल्क भरावे लागेल तसेच त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तिला तिकिट काढावे लागेल.
केंद्र आणि राज्य सरकार, तसेच गोवा सरकारच्या गृह विभागाने दिलेले ओळखपत्र दाखविल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास करता येईल. बेस्टच्या सर्वसाधारण, मर्यादित, जलद बसबरोबरच कॉरिडोर बसमधूनही त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.
बेस्टच्या बसमधून प्रवास करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांशी बसचालक आणि वाहकांनी सौजन्याने वागावे, असे आवाहन मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) प. ग. साखळकर यांनी केले आहे.

Story img Loader