नव्या बसगाडय़ांची संख्याही फक्त १७०ने वाढणार ’ शहर व उपनगरीय प्रवासांसाठी वेगवेगळ्या दरांचे पास
आकडेवारीची कसरत करत एक लाखाच्या प्रचंड शिलकीचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने या अर्थसंकल्पात प्रवाशांची ओंजळ रिकामीच ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षांत बेस्टचा ताफा २०४ ने कमी होणार असताना नव्या अर्थसंकल्पात हा ताफा १७०नेच वाढणार आहे. तसेच ६६४१.५२ कोटींचे उत्पन्न आणि ६६४१.५१ कोटी रुपयांचा खर्च दाखवत नफ्या-तोटय़ाचा ताळमेळ बेस्टने जमवला असला, तरी या पोकळ आकडेवारीतून प्रवाशांच्या वाटय़ाला नेमक्या कोणत्या सुविधा येणार, याचा काहीच उल्लेख अर्थसंकल्पात नाही. यामुळे बेस्ट समितीच्या अर्थसंकल्पीय बैठकीच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनीही अर्थसंकल्पाचा समाचार घेतला.
बेस्टच्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पात उपक्रमाचे उत्पन्न ६६४१.५२ कोटी रुपये असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यात विद्युत विभागाकडून ४५८९.८४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा आकडा विद्युत विभागाच्या २०१४-१५च्या अर्थसंकल्पातील उत्पन्नापेक्षाही तब्बल ३६ कोटी रुपयांनी कमी आहे. तर या वर्षांत परिवहन विभागाकडून २०५१.६८ कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता बेस्टला वाटते. २०१५-१६ या वर्षांत हा आकडा १५८५.३५ कोटी रुपये होता.
या आकडेवारीच्या खेळात प्रवाशांसाठी बेस्टने ३५१ नव्या गाडय़ांशिवाय काहीच दिलेले नाही. या नव्या गाडय़ा येत असताना बेस्ट १८१ गाडय़ा भंगारात काढत असल्याने नव्या गाडय़ांची संख्या फक्त १७० एवढीच राहणार आहे. या ३५१ पैकी १८१ गाडय़ा बेस्ट महापालिकेच्या अनुदानातून घेणार असली, तरी उर्वरित १७० गाडय़ा कुठून येणार, याचेही उत्तर या अर्थसंकल्पात नाही. त्याशिवाय अर्थसंकल्पात केवळ वेळापत्रकाचे संगणकीकरण, स्मार्ट सिटी प्रकल्पाद्वारे प्रवासी माहिती प्रणाली, रस्ते सुरक्षा पुढाकार, आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर बस प्रवास, गतिमान बससेवा आदी घोषणा केल्या आहेत. मात्र या घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठीची तरतूद दिसत नाही.
अर्थसंकल्पीय चर्चेच्या पहिल्या दिवशी समिती सदस्य आकाश पुरोहित, रंजन चौधरी, श्रीकांत कवठणकर आणि केदार होंबाळकर यांनी मते मांडली. बेस्टचे आर्थिक गणित सोडवण्यासाठी अनेक सूचना नेहमीच सदस्यांकडून केल्या जातात. मात्र गेली अनेक वर्षे त्या प्रत्यक्षात येत नसल्याची खंत होंबाळकर यांनी व्यक्त केली. प्रवाशांसाठी बेस्टने देऊ केलेल्या योजनांपैकी अनेक योजना इतर यंत्रणांच्या निधीवर अवलंबून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाशांसाठी खास काय?
’ बसगाडीची आगाऊ माहिती देण्यासाठी प्रवासी माहिती प्रणाली (स्मार्ट शहरे प्रकल्पांतर्गत पाच वर्षांत)
’ दैनंदिन बसप्रवासासाठी शहर व उपनगरीय प्रवाशांसाठी वेगवेगळ्या दरांचे पास
’ बसगाडय़ांच्या आरक्षण दरांत सवलत
’लहान मुलांसाठी वातानुकूलित बससेवांवर सवलतीचे प्रवासभाडे
’स्वतंत्र बसमार्गिका
’बस थांब्यांसमोर गाडय़ा उभ्या करण्यासाठी पिवळे पट्टे
’ ५० वातानुकूलित मिडी बसगाडय़ा

प्रवाशांसाठी खास काय?
’ बसगाडीची आगाऊ माहिती देण्यासाठी प्रवासी माहिती प्रणाली (स्मार्ट शहरे प्रकल्पांतर्गत पाच वर्षांत)
’ दैनंदिन बसप्रवासासाठी शहर व उपनगरीय प्रवाशांसाठी वेगवेगळ्या दरांचे पास
’ बसगाडय़ांच्या आरक्षण दरांत सवलत
’लहान मुलांसाठी वातानुकूलित बससेवांवर सवलतीचे प्रवासभाडे
’स्वतंत्र बसमार्गिका
’बस थांब्यांसमोर गाडय़ा उभ्या करण्यासाठी पिवळे पट्टे
’ ५० वातानुकूलित मिडी बसगाडय़ा