मुलुंड परिसरात बस थांब्यावर उभ्या राहिलेल्या बेस्टच्या बसच्या पुढच्या भागाने अचानक पेट घेतला. आगीमध्ये चालकाची केबिन भस्मसात झाली. सुदैवाने प्रवासी वेळीच बसमधून खाली उतरल्याने अनवस्था प्रसंग टळला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मुलुंडमधील महाराणा प्रताप चौक ते सहार कार्गोदरम्यान धावणारी बेस्टची ४०९ क्रमांकाची बस शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास वीणानगरमधून जात होती. वीणानगर थांब्यावर बस उभी राहिली आणि अचानक इंजिनमध्ये आग लागली. आगीचा भडका उडाला आणि काही क्षणातच आगीने बसचालकाच्या केबिनला वेढले. बसच्या पुढील भागातील काचा आगीमुळे तडकल्या. आगीचा भडका उडताच प्रवासी बसमधून खाली उतरले. या आगीत कुणीही जखमी झाले नाही, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी आणि नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

Story img Loader