बेस्ट बसभाडे कपातीच्या प्रस्तावाला बुधवारी राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच नवीन भाडेदर लागू केले जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. प्रवासी व उत्पन्नवाढीसाठी बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला. त्याला बेस्ट समिती व मुंबई पालिकेकडून मंजुरी मिळाली. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. त्यालाही बुधवारी मंजुरी मिळाली. बेस्ट प्रशासनाने सांगितले की, बेस्ट बस भाडय़ाच्या सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून अधिसूचना येण्यासाठी व आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील व त्यानंतर त्वरित भाडेकपातीची अंमलबजावणी केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवे भाडेदर..

प्रस्तावानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले आहे. सध्या दोन किलोमीटरसाठी आठ रुपये आकारले जातात. वातानुकूलित बसचेही किमान भाडे सहा रुपये असेल. सध्या वातानुकूलित बसचे किमान भाडे १५ रुपये आहे. प्रस्तावात १५ कि.मी.पुढील प्रवासासाठी साध्या बसकरिता २० रुपये भाडे असून वातानुकूलितसाठी १५ कि.मी.पुढील प्रवासासाठी २५ रुपये भाडेदर होईल.