पालिकेच्या २०१४-१५च्या अर्थसंकल्पात प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला दिलेली १०० कोटी रुपयांची मदत आणि स्थायी समितीने अर्थसंकल्पात फेरफार करीत पुरविलेली ५० कोटी रुपयांची रसद यामुळे मुंबईकरांपुढे ठाकलेले बस भाडेवाढीचे संकट यंदा टळले.
बेस्ट उपक्रमाच्या २०१४-१५च्या ६५१७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला बुधवारी पालिका सभागृहाने मंजुरी दिली. या अर्थसंकल्पात दर्शविलेल्या भाडेवाढीपोटी १५० कोटी रुपये महसूल बेस्ट उपक्रमाला मिळणार होता. मात्र शिवसेनेने भाडेवाढ टळावी यासाठी पालिकेने बेस्टला १५० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी आगामी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे ५० कोटी रुपये कसे उभे करायचे, असा प्रश्न बेस्ट उपक्रमापुढे पडला होता. मात्र स्थायी समितीने अर्थसंकल्पात फेरबदल करताना ५० कोटी रुपये बेस्टला दिले. त्यामुळे १ एप्रिलपासून होणारी बेस्ट भाडेवाढ टळली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा