रस्ता ओलांडताना बेस्टच्या बसची धडक बसून चेंबूर येथे बुधवारी रात्री अ‍ॅन्ड्रय़ू फर्नाडिस (४६) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालक दादू जाधव याला अटक करण्यात आली असून त्याल सुट्टीकालीन न्यायालयापुढे हजर करण्यात आले.कोपर खैरणे ते कुर्ला दरम्यान धावणारी बेस्ट बस क्रमांक ५०१ ची चेंबूर पोलीस ठाण्याजवळ येताच रस्ता ओलांडणाऱ्या फर्नाडिस यांना तिची धडक बसली. त्यांना तात्काळ शीतल रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Story img Loader