मुंबई : कुर्ला परिसरात झालेल्या भीषण अपघातात बेस्ट बसने सात पादचाऱ्यांचा जीव घेतला आणि चाळीसहून अधिक जण जखमी झाले. या अपघातानंतर बेस्टचा परिवहन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कोणतीही सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही कधीही नफ्यात नसते. त्याचप्रमाणे बेस्टचा परिवहन विभागही नेहमीच तोट्यात असतो. पण बेस्टची संचित तूट आठ हजार कोटींवर गेली असून या तुटीमुळे आता परिवहन सेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. तूट कमी करण्यासाठी भाडेतत्वावरील गाड्या घेण्यात आलेल्या आहेत. पण त्यामुळे तूट कमी झाली नाहीच पण अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईच्या रस्ते प्रवासाची शान असलेल्या बेस्टवरील कर्जाचा हा डोंगर बेस्ट आणि प्रवाशांसाठीही जीवघेणा ठरू लागला आहे.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू

हेही वाचा – मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानक – वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक वातानुकूलित बस सेवा सुरू

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँण्ड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट उपक्रमाचे विद्युत पुरवठा आणि परिवहन विभाग असे दोन विभाग आहेत. त्यापैकी विद्युत पुरवठा हा विभाग नेहमी नफ्यात असतो. मात्र परिवहन विभाग गेली अनेक वर्षे तोट्यात असून ही संचित तूट जवळपास आठ हजार कोटींवर गेली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच बेस्टने सादर केला. ९४३९ कोटींचा अर्थसंकल्प बेस्ट प्रशासनाने तयार केला असला तरी त्यात २१३२ कोटींची तूट असून अनुदान मिळेल या अपेक्षेवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी पालिकेकडून अनुदान मिळेल, या गृहितकावर हा अर्थसंकल्प बेतलेला आहे. मात्र महापालिका बेस्टला किती अनुदान देणार? हे अद्याप स्पष्ट नाही.

सध्याच्या बसगाड्यांची संख्या आणि स्थिती

बेस्ट उपक्रमात सध्या ३१६६ बसगाड्या आहेत. त्यापैकी २०८१ बसगाड्या या भाडे तत्त्वावरील आहेत तर बेस्टच्या स्वमालकीच्या सुमारे एक हजार गाड्या आहेत. त्यापैकी येत्या काही महिन्यात बेस्टच्या मालकीच्या ५१० गाड्यांचे आयुर्मान संपते आहे. त्यामुळे त्या मोडीत काढून त्या जागी एकमजली इलेक्ट्रीक वातानुकूलित २७३ बसगाड्या आणि २३७ मिडी इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र बेस्ट उपक्रमाने आधीच २१०० एक मजली इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी कार्यादेश दिला आहे. मात्र त्यापैकी केवळ २०५ गाड्या उपलब्ध होऊ शकल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या स्वमालकीच्या गाड्यांचा ताफा कमी झाला आहे. तसेच दुमजली १२०० इलेक्ट्रिक बसगाड्याही घेण्यात येणार आहेत. त्यापैकी केवळ ५० गाड्या उपलब्ध होऊ शकल्या आहेत. गाड्यांसाठी कार्यादेश दिलेले असले तरी एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्यामुळे बेस्टने गाड्या खरेदी करण्याचे ठरवूनही ते उद्दिष्ट्य साध्य झालेले नाही. त्यामुळे बेस्टची बिघडलेली सेवा आणखीनच विस्कळीत झाली आहे.

बसचे उद्दिष्ट गाठता येणार का ?

बेस्टने २०२६-२७ या आर्थिक वर्षात १०० टक्के शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक बसताफा साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्य ठेवले आहे. तसेच पुढील वर्षी बेस्टचा स्वमालकीचा बसताफा ८००० बसगाड्यांपर्यंत करण्याचे ठरवले आहे. मात्र ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य होणार का यावर बेस्टचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रवाशांच्या रांगा

बेस्टच्या बसगाड्यांची संख्या कमी झालेली असल्यामुळे त्याचा परिणाम बससेवेवर झाला आहे. बसथांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतात पण बस वेळेवर येतच नाही. बसगाडी आली तरी ती खच्चून भरलेली असते. त्यामुळे एकेकाळी ४५ लाख प्रवासी असलेल्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत.

हेही वाचा – कांदा…शेतकऱ्याला १५ रु., ग्राहकाला ८० रु.; चार दिवसांत दरांत क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण

भाडेतत्त्वावरील गाड्यांमुळे नफ्यापेक्षा तोटाच जास्त

बसगाड्यांच्या देखभालीवरचा आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावरचा आस्थापना खर्च कमी करण्यासाठी बेस्टने भाडेतत्वावरील बसगाड्यांचे धोरण स्वीकारले खरे पण त्यामुळे बेस्टची तूट कमी झाली नाहीच पण बेस्टची पत मात्र घसरली. भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या कंत्राटदारांच्या चालकांची मुजोरी, प्रवाशांबरोबर चालकांची होणारी भांडणे, दुर्दशा झालेल्या बसगाड्या, गाडी वेळेवर न येणे यामुळे प्रवासी या सेवेपासून दुरावत चालले आहेत.

चालक वाहकांमधला समन्वय संपला

बसगाडीवरचे चालक आणि वाहक हे दोन्ही पूर्वी बेस्ट उपक्रमाचे असत. चालक आणि वाहकांच्या अशा अनेक वर्षांच्या जोड्या होत्या. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी समन्वय होताच पण जिव्हाळ्याचे, एकमेकांना सांभाळून घेण्याचे संबंध होते. त्यामुळे बससेवाही उत्तम मिळत होती. मात्र कंत्राटदाराच्या चालकांचे आणि बेस्टच्या वाहकांचे संबंध हे तसे नाहीत हे देखील बेस्टच्या बिघडलेल्या व्यवस्थेचे कारण असल्याचे मत बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केले आहे.

टॅक्सी, रिक्षाचे फावले

बेस्टची सेवा बिघडल्यामुळे मुंबई शहरात टॅक्सी चालकांना चांगला भाव मिळू लागला आहे. तर उपनगरात शेअर रिक्षावाल्यांनी बेस्टच्या सेवेची ही कमतरता भरून काढली आहे. मुंबईत नोकरदारांना पैशांपेक्षा वेळेचे महत्त्व अधिक असते. त्यामुळे बस नाही आली तर प्रवासी टॅक्सी किंवा रिक्षाकडे वळतात. चर्चगेटकडून कुलाबा, नरीमनपॉईंट आदी परिसरात जाणाऱ्या बसगाड्या आहेत पण शेअर टॅक्सीची सेवा अधिक संख्येने आहे. त्यामुळे बेस्टचा तिकीट दर कमी असला तरी गाड्या कमी असल्यामुळे प्रवासी शेअर टॅक्सीची वाट धरतात.

Story img Loader