मुंबई : आधीच बेस्टच्या बसगाड्यांचा ताफा कमी झाल्यामुळे प्रवासी संख्या घटलेली आहे. त्यातच अनेक ठिकाणी बेस्टला विविध विकासकामांमुळे बसमार्ग बदलावे लागत आहेत. त्यामुळे बेस्टच्या महसुलावरही परिणाम होऊ लागला आहे. शीव येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे तब्बल सहा बसमार्ग वळवावे लागले आहेत.

कुर्ला येथील अपघातामुळे बेस्टच्या दुर्दशेची चर्चा होऊ लागली आहे. बेस्ट उपक्रमावरील वाढत चाललेले कर्ज, परिवहन विभागाचा घटलेला नफा, वाढत चाललेली तूट, खासगीकरणामुळे बेस्टचे बिघडत चाललेली सेवा या सगळ्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यातच बसगाड्यांचा ताफा कमी झाल्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर ताटकळ उभे राहावे लागत आहे. खूप वेळाने एखादी बस आली तरी ती खूप भरलेली असते. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. तसेच भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना वारंवार होणारे अपघात आणि बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना यामुळे प्रवासीही बेस्टच्या सेवेपासून दुरावू लागले आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून बेस्टचा महसुलही बुडत आहे. बेस्टच्या दुर्दशेचे हे चक्र सुरू असतानाच अनेक ठिकाणी विकासकामांमुळे बसमार्ग वळवावे लागत आहेत. त्याचाही फटका बेस्टच्या सेवेला बसत आहे. गेली पाच ते सहा वर्षे मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील बसथांबे गेली पाच, सहा वर्षे बंद आहेत. त्यातच मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळेही बसमार्ग वळवावे लागले आहेत. ही कामे वर्ष, दोन वर्षे चालणार असल्यामुळे तेवढ्या काळासाठी हे बसमार्ग वळवले जाणार आहेत.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
mahakumbh 2025 shocking video Chaos At Jhansi Railway Platform As Passengers Rushing To Board Maha Kumbh Special Train Fall On Track
Mahakumbh 2025: बापरे! महाकुंभला जाताना रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कोण रुळावर पडलं तर कोण चेंगरलं; थरारक VIDEO समोर
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास

हेही वाचा – शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन

शीव उड्डाणपुलाच्या कामांमुळे सहा बसमार्ग वळवले

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील उड्डाणपुलाचे काम चालू असल्यामुळे बस मार्ग ए २५, १७६, ३०५, ३१२, ए ३४१, ४६३ हे बसमार्ग वळवण्यात आले आहेत. या मार्गावरील बसगाड्या अप दिशेमध्ये अशोक मिल नाका येथे डावे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने, पिवळा बंगला सिग्नल (वाय जंक्शन) येथे उजवे वळण घेऊन धारावी आगार, नाईक नगर येथे डावे वळण घेऊन आपल्या नियोजित मार्गाने पुढे जातील, असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा बसमार्ग डाउन दिशेमध्ये नाईक नगर येथे उजवे वळण घेऊन पिवळा बंगला सिग्नल येथे डावे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे जाऊन अशोक मिल नाका येथे उजवे वळण घेऊन ९० फूट मार्गे व पुढे आपल्या नियोजित मार्गाने जातील. तसेच बसमार्ग ११ जादा व ३७४ च्या बसगाड्या शीव येथे खंडित करून तेथेच यू टर्न घेऊन धारावी आगार मार्गे पिवळा बंगला व पुढे आपल्या नियोजित मार्गाने जातील. हे काम दोन वर्ष चालणार असल्यामुळे तेवढा काळ हे मार्ग वळवावे लागणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग ए २५, ३१२, ३४१ साठी संत रोहिदास मार्गावर काळाकिल्ला मार्केट, संत चन्नय्या मार्गावर धारावी आगार, पीएमजीपी कॉलनी, नाईक नगर हे अतिरिक्त बस थांबे देण्यात आले आहेत.

हेही वाचा – मुंबई : सुश्रुषागृहांची सुरक्षा रामभरोसे, कॅगच्या अहवालात नोंदणीच्या नूतणीकरणावर ठपका

भाईंदरमध्येही बसमार्ग वळवले

बेस्टची सेवा पश्चिम उपनगरात भाईंदरपर्यंत आहे. मात्र भाईंदरमध्येही विकासकामे सुरू असल्यामुळे तिथेही बसमार्ग वळवले आहेत. भाईंदर स्थानक पश्चिम व भाईंदर पोलीस ठाणे, उत्तन रोड व मांडली तलाव रोड येथे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे बस मार्ग क्रमांक ७१० चे प्रवर्तन मॅक्सेस मॉल येथे खंडित करण्यात आले आहे. हे काम दोन वर्ष चालणार असल्यामुळे तेवढा काळ हे मार्ग वळवावे लागणार आहेत.

Story img Loader