भाजपने लक्ष केंद्रीत केलेल्या माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील बेस्ट बस थांबे कोणतीही पूर्वकल्पना न देता, तसेच सूचना-हरकती न मागविताच अचानक अन्यत्र हलविण्यात आल्याने रहिवासी आणि प्रवाशांचा उद्रेक झाला आहे. नागरिकांनी अडथळा निर्माण करू करू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे थांबे हलविण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाती तीन आमदार, बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविलेले माजी नगरसेवक या मतदारसंघात असतानाही अचानक बस थांबे अडटणीच्या ठिकाणी हलविण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रम आणि मुंबई महानगरपालिकेने हे बस थांबे कुणासाठी, कुणाच्या सूचनेवरून स्थलांतरित केले याचा शोध रहिवासी घेत असून स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणात लक्ष घालावे, असे साकडे रहिवाशांनी घातले आहे.

हेही वाचा >>> Mumbai Rains Live : राज्यभरात मुसळधार पाऊस, ‘या’ पाच जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…

गेली अनेक वर्षे वरळी परिसरातीस सिमेन्स कंपनीच्या कार्यालयाजवळील कॉ. पी. के. कुरणे चौकाजवळ बेस्ट उपक्रमाचे दोन थांबे होते. येथे जवळच बेस्टचे बस आगार आहे. या आगारातून ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर दादर, भोईवाडा, परळ आदी भागात बसगाड्या जातात. यापैकी परळ, हिंदमाता, दादर, प्रभादेवी, वांद्रे परिसरात जाणाऱ्या बसगाड्या कॉ. पी. के. कुरणे चौकातील थांब्यावर उभ्या राहात होत्या. या बसथांब्यावर थांबणाऱ्या बसगाड्यांमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी या थांब्यावर येत होते. ताडदेव, परळ, प्रभादेवी, एल्फिन्स्टन आदी भागातील नागरिक नवी मुंबई, ठाण्याला जाणाऱ्या बेस्टच्या बसगाड्यांसाठी कॉ. कुरणे चौकाजवळील थांब्यांपर्यंत इतर बसमधून येत होते. मात्र आता कॉ. कुरणे चौकाजवळील दोन बस थांबे बीडीडी चाळ क्रमांक ३८ च्या समोर हलविण्यात आला आहे. हा रस्ता अरुंद असून स्थलांतरित केलेल्या बस थांब्यांजवळच मोठी सार्वजनिक कचराकुंडी आहे. या निमुळत्या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. आता बस थांबेच तेथे हलविल्यामुळे रहिवाशांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. तसेच बीडीडी चाळ क्रमांक ५२ जवळ अंध मुलांची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॉ. कुरणे चौकाजवळील थांबे सोयीचे होते. थांबे स्थलांतरित करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> VIDEO: गोष्ट मुंबईची – बंद केले मिठी नदीचे एक तोंड आणि मग हाहा:कार झाला!

पूर्वी आगारातून येणाऱ्या बसगाड्या कॉ. कुरणे चौकात वळवताना चालकांना फारशी कसरत करावी लागत नव्हती. परंतु बीडीडी चाळ क्रमांक ३८ समोरील निमुळत्या रस्त्यावर बसगाड्या वळवताना वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याच्या शक्यतेने रहिवासी, पादचारी आणि प्रवासी हवालदिल झाले आहेत. हे बस थांबे मुळ ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली असून यासंदर्भात बॅनर्स झळकवून रहिवाशांनी निषेध नोंदवला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले आहेत. त्याचबरोबर सुनील शिंदे आणि सचिन अहिर विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या परिसरातील प्रभागामधून विजयी झालेले माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. याच विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून माजी महापौर किशोरी पेडणेकर निवडून आल्या होत्या. असे असतानाही बेस्ट बस थांबे हलविण्यास विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी कुणीच उभे राहिले नाही, अशी खंत येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. स्थानिक आमदार या नात्याने प्रकरणात लक्ष घालून बस थांबे पूर्वीच्या ठिकाणी हलवावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. विकासकाला अडचण ठरल्यामुळे हे थांबे हलविल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवल्याचे समजते. या दोन बस थांब्यांवर बेस्ट बस क्रामाक ४४, ५०, १२४, १२५, १६८, ३५, ३७, ८६, ८८, ११० १५१, १६४, १६५, १७१, ३५७ आणि ३८५ बस थांबत होत्या. या बसगाड्यांमधून मोठ्या संख्येने प्रवासी इच्छित स्थळी रवाना होत होते. अचानक बस थांब्यांची जागा बदलण्यात आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडणार आहे.

दरम्यान, विकासकासाठी बस थांबे हलवले हे जरी खरे असले तरी, मागच्या आठवड्यात काही स्थानिक रहिवासी भेटले होते. बेस्टच्या महाव्यवस्थापकांना सदर विषयाबाबत पत्र पाठविले आहे. मंगळवारपर्यंत उत्तर न आल्यास सर्वांनी त्यांना जाऊन भेटायचे ठरले आहे. आमदार या नात्याने स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Story img Loader