मुंबई: गणेशोत्सव काळात मुंबईकरांसाठी विशेष बस सेवा चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘बेस्ट’ योजना चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७५ टक्के सवलत
बसमार्ग क्र १ मर्या.- इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा आगार ते वांद्रे रेक्लेमेशन बसस्थानक
बस मार्ग क्र.४ मर्या- ओशिवरा आगार ते सर जे.जे रुग्णालय
बस मार्ग क्र. ७ मर्या-विक्रोळी आगार ते सर जे.जे रुग्णालय
बस मार्ग क्र.८ मर्या- शिवाजी नगर ते सर जे.जे रुग्णालय
बस मार्ग क्र ६६ मर्या.-राणी लक्ष्मीबाई चौक ते कुलाबा आगार
बस मार्ग क्र.२०२ मर्या- माहीम बस स्थानक ते बोरिवली स्थानक (पश्चिम)
सी-३०२ राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
सी-३०५ बॅकबे आगार ते धारावी आगार
सी-४४० माहीम बसस्थानक ते बोरिवली स्थानक (पूर्व)