बसमधून फुकट अथवा कमी अंतराच्या तिकीटावर दूरचा प्रवास करणाऱ्या तब्बल २२,७३४ प्रवाशांची धरपकड करीत ‘बेस्ट’ने १५ लाख ६९ हजार ९६१ दंड वसूल केला.
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये तिकीट तपासनीसांनी विनातिकीट अथवा कमी अंतराच्या तिकीटावर दूरचा प्रवास करणाऱ्या २२ हजार ७३४ प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून १५ लाख ६९ हजार ९६१ दंड वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने प्रवासभाडय़ाच्या दहापट रक्कम भरण्यास नकार दिल्यास त्याल एक महिना पोलीस कोठडी किंवा २०० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.