मुंबई : विजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस सप्टेंबरपासून सेवेत दाखल करण्याचा निर्णय ‘बेस्ट’ उपक्रमाने घेतला होता. मात्र, पुण्यातील ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरमध्ये (एआरएआय) या बसची अद्याप चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या महिन्यात बस सेवेत दाखल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवासी वाहतुकीची अधिक क्षमता असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बस भाडेतत्त्वावर ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. पुण्यातील ‘एआरएआय सेंटर’मध्ये विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बसच्या चाचणीला सुरुवात झाली असून सप्टेंबरमध्ये या बस सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात चारपैकी तीन बस सेवेत येणार होत्या. मात्र त्यालाही विलंब झाला आहे. या महिन्यात दुमजली वातानुकूलित बस प्रवाशांच्या सेवेत येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वाहकांना संपर्कासाठी व्यवस्था..

दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असून ते उघड किंवा बंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसह बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्थाही आहे. या बसची ८० मिनिटांत ‘चार्जिग’ पूर्ण होते. क्षमता ६६ असून उभ्याने दहा जण प्रवास करू शकतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best electric double decker air conditioned bus soon test started in pune ysh