मागील दिवाळीचा बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी मध्यस्थी करावी, असे साकडे बीईएसटी वर्कर्स युनियनने बुधवारी महापौर सुनील प्रभू यांना घातले.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती नाजूक बनल्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यास नकार दिला होता. परिणामी, कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली होती. कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी आता महापौरांनीच मध्यस्थी करावी, अशी मागणी बीईएसटी वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन केली. २८ एप्रिल २०१२ रोजी करण्यात आलेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना विनाविलंब थकबाकीही मिळवून द्यावी, असे साकडेही पदाधिकाऱ्यांनी महापौरांना घातले.

Story img Loader