सात ऑगस्टपासून संप करण्याबाबत कामगार संघटना ठाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवाशर्तीबाबत तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात या मागणीसाठी ७ ऑगस्टपासूनच्या संपावर ठाम राहण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचे सोमवारी वडाळा आगारात झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले.

बेस्ट प्रशासन व कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार एप्रिल २०१७ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना उर्वरित दहा वेतनवाढ मंजूर करून त्याची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली. वेतनवाढीसंदर्भात अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बेस्ट वर्कर्स युनियनकडून प्रशासनाला चार वेळा पत्रही दिले. मात्र प्रतिसाद न दिल्याने संघटनांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी वडाळा आगारात युनियन व कर्मचाऱ्यांमध्ये अंतिम बैठक पार पडली. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप मागे घेऊ नये, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

मुंबई राज्य शासनाच्या ऊर्जा व कामगार विभागाने मान्यताप्राप्त असलेल्या बेस्ट उपक्रमातील बेस्ट वर्कर्स युनियन आणि द बॉम्बे इलेक्ट्रिकल वर्कस युनियनला ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध कायद्या’तून वगळल्याची अधिसूचना शुक्रवारी काढली आहे. त्यामुळे कामगारांचे हक्क हिरावले जाणार असल्याने त्याविरोधात दोन ते तीन दिवसांत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचे युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले.